ओम गुरूदेव नमः महिला पतंजली योग समिती अमळनेर कडून महाशिवरात्री उत्सव साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

ओम गुरूदेव नमः महिला पतंजली योग समिती अमळनेर कडून महाशिवरात्री उत्सव साजरा.

अमळनेर : विक्की जाधव.

ओम गुरुदेव नमः महिला पतंजली योग समिती मार्फत महाशिवरात्री च्या पूर्वसंध्येला उत्सवाचे औचित्य साधून अमळनेर तहसील साठी समीती गठीत करण्यात आली जिल्हा महामंत्री ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला.

त्यात अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार, कोषाध्यक्ष रत्ना भदाणे आणि प्रा.उषा पवार, संघटन मंत्री निवेदिता कापडणे, महामंत्री ज्योती पाटील आणि वैशाली भामरे ,मिडीया प्रभारी माधुरी पाटील आणि रेखा भागवत , संवाद प्रभारी रुपाली पाटील आणि रूपाली बोरसे असे पदं वितरीत करण्यात आली तसेच महाशिवरात्री च्या पूर्वसंध्येला होम हवन सोहळा पार पडला रेऊनगर येथील विश्वकर्मा मंदिर ढेकूरोड महादेवाची आराधना करून सोहळा पार पडला प्रत्येक योग वर्गातील योग साधकाने आपल्या ला योगाचे फायदे व सकारात्मक अनुभव सांगितले या कार्यक्रमात तांबे पुरा, शिवाजी नगर,रामवाडी,पटवारी काॅलनी, ढेकू रोड , पिंपळे रोड , दाजीबा नगर असे सर्व 10 योग वर्गाचे योग शिक्षक व योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते समिती गठीत करण्यासाठी जिल्हा प्रभारी जयश्री पाटील व राज्य कार्य कारणी महानंदा पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामिनी पवार आणि सर्व योग शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!