महाशिवरात्रीसाठी भाविकांना दिलासा! कपिलेश्वर दर्शनासाठी अमळनेरहून जादा बसेसची सोय

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाशिवरात्रीसाठी भाविकांना दिलासा! कपिलेश्वर दर्शनासाठी अमळनेरहून जादा बसेसची सोय.

 

अमळनेर : विक्की जाधव.

महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अमळनेर आगाराने विशेष पुढाकार घेत जादा बसेसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे हजारो शिवभक्तांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या विशेष बसेस अमळनेर – निंब – कपिलेश्वर मंदिर या मार्गावर नियमित फेऱ्या मारणार आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू राहणार असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात्रेदरम्यान होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच खासगी वाहनांऐवजी बससेवा वापरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला कपिलेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून, बससेवेच्या या निर्णयामुळे यात्रेला अधिक गती मिळणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!