संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम; केंद्रात अव्वल कामगिरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम; केंद्रात अव्वल कामगिरी..

 

मार्मिक समाचार शिरपूर : सुनील सूर्यवंशी.

मोहिनीराज संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. मनाली सुघोष उपासनी यांनी नोव्हेंबर २०२५ सत्रात घेतलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या ‘संगीत अलंकार’ परीक्षेत प्रथम श्रेणीसह केंद्रात प्रथम येत दैदिप्यमान यश संपादन केले. नाशिक येथील अथर्व संगीत विद्यालयातून परीक्षा देत त्यांनी ही मानाची कामगिरी बजावली.

त्यांच्या या यशामुळे शिरपूर शहरासह संगीत वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.या यशामागे त्यांना लाभलेले गुरूंचे सखोल मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. अमळनेर येथील संगीत अलंकार सौ. मोहिनी खाडिलकर तसेच पुणे येथील ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका संगीताचार्य डॉ. नीता भाभे यांनी त्यांना अभ्यास, रियाज व सादरीकरणाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. याशिवाय धुळे येथील सौ. भावना कुळकर्णी, डॉ. प्रा. प्रदीप कुळकर्णी व जळगाव येथील श्री. दुष्यंत जोशी यांचेही सहकार्य लाभले. सातत्यपूर्ण रियाज, अभ्यासपूर्ण तयारी आणि गुरूंचे आशीर्वाद यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना मनाली उपासनी यांनी व्यक्त केली.

सौ. मनाली उपासनी या दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षिका सौ. संजीवनी मुळे व सेवानिवृत्त शिक्षक श्री. शामकांत मुळे यांच्या कन्या आहेत. तसेच त्या शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. सुघोष उपासनी यांच्या पत्नी असून, भाऊ श्री. वैभव मुळे, भावजय सौ. प्रियंका मुळे व मुलगी कु. ऋचा उपासनी यांची त्यांना भक्कम साथ लाभली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!