कपिलेश्वर मंदिरावर महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराजांचा २९ वा संन्यास वर्धापन दिन उत्साहात..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कपिलेश्वर मंदिरावर महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराजांचा २९ वा संन्यास वर्धापन दिन उत्साहात..

अमळनेर : विक्की जाधव.

कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचा २९ वा संन्यास वर्धापन दिन दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुवारी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथील प्रमुख संन्याशांची उपस्थिती लाभली. २९ वर्षांच्या संन्यस्त जीवनप्रवासाचा आढावा घेत महाराजांच्या अध्यात्मिक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराजांनी आपल्या साधना, सेवा आणि समाजकार्यातील अनुभव कथन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.


महाराजांनी गेल्या जवळपास तीन दशकांत शेकडो भाविकांना व्यसनमुक्त करून रामनामाचा छंद लावला, तसेच पाठशाळेद्वारे अनेक विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे दिले. आतापर्यंत दहा प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. यावेळी रामानंद तीर्थ महाराज व देवेश्वर तीर्थ स्वामी यांनी हंसानंद महाराजांच्या सानिध्यात लाभलेल्या ज्ञानप्राप्तीच्या अनुभवांना उजाळा दिला. कार्यक्रमास जेष्ठ विश्वस्त घनश्याम अग्रवाल (अमळनेर), विश्वस्त श्री मंगल तात्या, पानाचंद पाटील, लादु भिवसन चौधरी, सुदाम पाटील, तुकाराम चौधरी, नामदेव कोळी यांसह पंचक्रोशीतील शेकडो भाविक उपस्थित होते. ट्रस्टचे सचिव मगन भाऊसाहेब यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष सी. एस. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. भंडारा व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!