“तीन दिवसांत चार लाखांची उचल” विद्यार्थी पालकांचा कष्टाचा पैसा जातोय का संचालकांचा खिशात?

अपनी भाषा में पढ़े! Translate

“तीन दिवसांत चार लाखांची उचल” विद्यार्थी पालकांचा कष्टाचा पैसा जातोय का संचालकांचा खिशात?

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेरमध्ये शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारे आरोप पुढे येत असून, खान्देश शिक्षण मंडळ संचालित PBA स्कुल च्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वार्षिक स्नेहसंमेलनातील “तीन दिवसांत चार लाखांची उचल” अशी चर्चा शहरात रंगत असून, हा पैसा नेमका कुठे आणि कशासाठी वापरला गेला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. येव्हडेच काय तर

प्रताप कॉलेजने काढलेल्या नवीन टेंडर प्रक्रियेवरही शहारात चर्चा सुरू आहे. “दळणही आमचं आणि चक्कीही आमची” अशा पद्धतीने व्यवहार झाल्याचा आरोप होत असून, बिलबुक चे एका किरकोळ ठेकेदाराचे सुमारे ८ लाखांचे बिल काही दिवसांतच मंजूर झाल्याची माहिती पुढे येत आहे. या व्यवहारांचा सविस्तर तपशील जाहीर का केला जात नाही? पारदर्शकतेचा अभावच शंका वाढवणारा ठरत आहे.

मात्र त्या बिलाचा तपशील आणि हिशोब अद्याप स्पष्ट झालेला नाही. संबंधित संचालक स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्याने सर्व व्यवहार नियमांनुसार असल्याचा दावा करत असले तरी पारदर्शकतेअभावी संशयाचे सावट कायम आहे. सर्वात ठळक आणि संवेदनशील मुद्दा ठरतो आहे तो म्हणजे PBA इंग्लिश मीडियम स्कूलचा. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नावाखाली प्रत्येकी ३५० रुपये विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांकडून जमा झालेली ही रक्कम नेमकी किती? आणि ती खर्च कशी झाली? याचा अधिकृत हिशोब पालकांसमोर का ठेवला जात नाही? एका फोटोग्राफरचे बिल जर फक्त सहा हजार होत असेल तर सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या खिशातून जमा झालेल्या अमाप पैशांबाबत शाळेचे उत्तरदायित्व असणे आवश्यक नाही का? असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. येथेच ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या शिक्षकांचे पगार देखील अल्प असून शिक्षण हे समाज घडवण्याचे माध्यम असताना त्याच क्षेत्रात आर्थिक अनियमिततेची चर्चा होणे ही चिंतेची बाब आहे. PBA चा मुद्दा आता केवळ एका शाळेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा प्रश्न बनत आहे. या सर्व व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अन्यथा पालकांचा आक्रोश आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!