नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या हस्ते नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर सेंट्रल स्कूल मुले नं.१ या शाळेत सुसज्ज संगणक लॅबचे उद्घाटन करमाळ्यातील एकमेव ‘पी एम श्री’ मानांकित शाळेच्या प्रगतीचे नगराध्यक्षांकडून कौतुक; मुख्याध्यापिका सुनंदा जाधव-माने यांच्या परिश्रमांना यश

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- नगर परिषद सेंट्रल स्कूल मुले नंबर एक, ‘नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर’ या शाळेत पी एम श्री योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुसज्ज संगणक लॅबचे दिमाखदार उद्घाटन नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या हस्ते पार पडले. करमाळा शहरातील ही एकमेव शाळा आहे, जिला या योजनेतून आधुनिक संगणक लॅब मंजूर झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठी गती मिळणार आहे.
या विशेष कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी करमाळा शहर विकास आघाडीचे गटप्रमुख तथा नगरसेवक संजय सावंत, भाजपा गटप्रमुख तथा नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेवक रवी जाधव, नगरसेविका चैताली सावंत, ज्योत्सना लुनिया, जबीन मुलाणी, स्वाती फंड, लता घोलप यांच्यासह, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर,प्रियांका गायकवाड, पत्रकार विशाल घोलप, पालक विशाल गायकवाड आणि प्रशासन अधिकारी बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, मुख्याध्यापिका सुनंदा जाधव-माने आणि त्यांच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियान, क्रीडा स्पर्धा, दिंडी, आणि विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानासाठी आयोजित केला जाणारा आनंदी बाजार यांसारखे उपक्रम ही शाळा अतिशय प्रभावीपणे राबवत आहे.नगराध्यक्षांनी यावेळी मुख्याध्यापिकांना शाळेच्या भावी प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.


ही संगणक लॅब मंजूर करून आणण्यासाठी मुख्याध्यापिका सुनंदा जाधव-माने यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळेने आजवर जिल्हास्तरावर अनेक मोठी पारितोषिके पटकावून सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याचा नावलौकिक मिळवून दिला आहे. वार्षिक स्नेहसंमेलन आणि महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याच्या पद्धतीतून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती लाभली होती. आधुनिक संगणक लॅबमुळे आता नामसाधना विद्यालयातील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या युगात अधिक सक्षम होणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!