श्री मंगळ ग्रह मंदिरात गुरुवारी सामूहिक पारायण

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री मंगळ ग्रह मंदिरात गुरुवारी सामूहिक पारायण

 

अमळनेर : विक्की जाधव.

 श्री मंगळ ग्रह मंदिरात गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत सामूहिक पारायण होणार आहे. श्री मंगळ ग्रह मंदिर येथे विश्वात कोठेही नसलेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण श्री स्वामी समर्थांची अलौकिक प्रतिमा आहे. तसेच विश्वातील एक मात्र कमंडलूस्थित श्री गुरुदत्त व श्री अनघा लक्ष्मी मातेचे मंदिर आहे.

या पार्श्वभूमीवर या वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाने दरवर्षी सामूहिक पारायणाचा कार्यक्रम घेण्याचे सुनिश्चित केले आहे. पारायणासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी नाष्ता व भोजन महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पारायणाला येणाऱ्या भाविकांनी सोबत आसन, गुरुचरित्र ग्रंथ, माळ व पाण्याची बाटली आणावी. पारायणासाठी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!