युवा कल्याण प्रतिष्ठान संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत….
दोंडाईचा- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त…. ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित नूतन माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दोंडाईचा येथील उपक्रमशिल शिक्षक श्री. नारायण पुंडलिक भिलाणे यांना ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ए. डी. पाटील. यांनी त्यांना गौरविले. त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थीनी कु. देवयानी बन्सीलाल धोबी हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ट्रॉफी प्रमाणपत्र व पंधराशे रुपयांचे रोख बक्षीस, कु.हितश्री अविनाश पाटील, कु. मृण्मयी नारायण भिलाने ,चंद्रजीत नारायण भिलाणे यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र, ट्रॉफी व दोनशे रुपये रोख देऊन विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ए. डी. पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वकृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार यांनी ते सन्मानित झालेले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी ऑनलाईन शिक्षणात युट्युब फेसबुक इंस्टाग्राम गुगल मॅप झूम यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रभावी काम केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार राज्यमंत्री आदरणीय डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख, ज्ञानोपासक शिक्षण मंडळी दोंडाईचाचे चेअरमन आदरणीय डॉ.बापूसाहेब रविंद्र देशमुख, धुळे शहराचे माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे साहेब, संचालक आदरणीय दादासाहेब अमितदादा पाटील ,संचालिका आदरणीय अनिताताई रविंद्र देशमुख, सचिव आदरणीय जुईताई देशमुख – पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय गणेश भाऊसाहेब, ज्युनियर कॉलेजचे समन्वयक प्रा. डॉ. बी.बी पाटील, उपप्राचार्य श्री ए जी पाटील श्री सी एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. बी. एच. पाटील, प्रा.पी.जी.कागणे, एस.एम.साळूंखे,एस एस मुळे,एस. एस देवकर , गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के.पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नानासाहेब टी.पी. शिंदे , राज्य विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष दत्तात्रयजी आरोटे, धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष आबासाहेब पी. झेड. कुवर , कार्याध्यक्ष संजयजी पवार, सचिव आदरणीय सी.टी. पाटील ,धुळे जिल्हा उपक्रम समिती प्रमुख संजय गोसावी, शिंदखेडा तालुका विज्ञान अध्यक्ष रवींद्र चित्ते, सहसचिव वाय.आर. देसले , ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंत बी सोनवणे, , डी व्ही सूर्यवंशी साक्री, एस एन पाटील शिंदखेडा, एम बी मोरे धुळे, जे.डी भदाणे, सुधाकर माळी (मुख्याध्यापक ) , के सी साळुंके धुळे शहर राजीव पाटील धुळे ग्रामीण , के.एस.बच्छाव साक्री , व विज्ञान गणित संघाचे सर्व पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी यांच्यासहित सर्वच शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनी, विद्यार्थी व पालक यांच्या तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या या यशाचे कौतुक व अभिनंदन सर्वत्र होत आहे.