धुळे : धुळे एलसीबी विभागाने येथील चाळीसगाव चौफुलीवर चोरीच्यामोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून जिल्ह्यातून चोरलेल्या एकूण ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यात दोंडाईचातून चोरीला गेलेल्या ३ मोटारसायकली आहेत.तरी मुळ मालकांनी आपली चोरी गेलेल्या मोटरसायकलीची ओळख पटवून,घेऊन जायचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.आज दिनांक ८ मार्च मंगळवार रोजी धुळे एलसीबीने केलेल्या कार्यवाहीत दोन जणांकडून सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मागे दोंडाईचा शहरासह धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ही बाब गांभीर्याने घेत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.आज पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार असे की दोघे जण चोरीच्या मोटारसायकलची विक्री करण्यासाठी चाळीसगाव रोड चौफुलीवर येत आहेत. त्यामुळे श्री. बुधवंत यांनी लगेचच आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.पोलीस पथकाने सापळा रचून सकाळी दहाच्या सुमारास दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोंडाईचा, शिरपूर, शहादा, नंदुरबार येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यात दोंडाईचातील ३, शहाद्याची एक, नंदुरबारची एक, धुळे शहरातील दोन मोटारसायकली आहेत.सदर कार्यवाही सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरिक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोहेकाँ संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.तरी संबधीत मुळ मालकांनी मोटरसायकलची ओळख पटवून घेऊन जायचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.