June 30, 2025 11:51 am

शिरपूर येथे हिंदू राष्ट्रसेनेची आढावा बैठक संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. धनंजयभाई देसाई यांचे आदेशाने तसेच हिंदू राष्ट्रसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क मा. श्री. मोहनजी तिवारी यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली गुजर मंगल कार्यालय येथे हिंदू राष्ट्र सेनेची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रमुख म्हणुन निलेश सपकाळे, जळगाव जिल्हा नवयुवक अध्यक्ष अनिल धुळे (उप महानगर प्रमुख) जळगांव सुशिल इंगळे भुसावळ ता. प्रमुख दिनेश बागुल उपमहानगर प्रमुख जळगाव विशालजी धुळे, विक्कीजी धुळे, शुभम सपकाळ धुळे, राकेश सोनवणे, धुळे विकासजी धुळे, राकेश ढिवरे धुळे.

कार्यक्रमास सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. त्या नंतर अध्यक्षीय भाषण मा. मोहनजी तिवारी यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्म टिकुन ठेवावयाचा असेल तर सर्व हिंदू धर्म यांनी जात पात न पाहता, फक्त आपण एक आहोत, हिंदू आहोत म्हणुन एकत्र येणे काळाजी गरज आहे. आज आपल्या धर्म बद्दल प्रत्येक युवाच्या मनात जनजागृती होती. सर्व हिंदू धर्म एका व्यासपीठावर येवुन आम्ही सर्व एक आहोत हे दाखविण्याची वेळ आली आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातुन आज फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात हिंदू धर्म प्रचार प्रसाराचे काम जोराने सुरु करावे गोहत्या पूर्णपणे बद व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात गोहत्या बंदी समिती तयार करण्यास येतील, शिरपूर तालुका लागुन मध्यप्रदेश सीमा आहे. याच रस्त्याने गोहत्या तस्करी सुरु आहे, गोहत्या तस्करी लवकरात लवकर आपल्याला बंद करावयाची आहे. हिंदू धर्माचे अनेक प्रश्न आहेत. त्यात लव जिहादचे नांवाने आपल्या बहिण, बेटी, यांचवेर अन्याय होत आहे. आणि आपण उघडया डोळ्यांनी पाहत आहोत, हिजाब चे विरोधात किती तरी हिंदू पुढे आले, असे एक नव्हे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला या सर्व गोष्टींना लक्ष देण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमास सागर रामराव पाटील, वावडया पाटील, तुषार बारी, जयेश मोरे, दिनेश कोळी, भटु पाटील, कृष्णा मराठे, सुनिल सुर्यवंशी, किरण कोळी, नक्षत्र पाटील, अमोल पाटील, रोहीत भोई, विक्की पाटील, मिथुन गोसावी, भुपेश मराठे, श्रीनाथ शिंदे, अतुल सोनार, सनी पाटील, राज कोळी, बंटी माळी, वैभव कोळी, बंटी सोनवणे, मोन्या मराठे, विपुल कलाल, निलेश मराठे, जितु कोळी, पप्पु मराठे, भुरा शिंपी, सागर पाटील, आनंद पाटील तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील हिंदू प्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रेमकुमार चौधरी यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!