भिगवण शेटफळ गटात कोणाची उमेदवारी कोठून फिक्स आणि कोणाची विकेट रिक्स याकडे नागरिकांचे लक्ष

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण शेटफळ गटात कोणाची उमेदवारी कोठून फिक्स आणि कोणाची विकेट रिक्स याकडे नागरिकांचे लक्ष

(निलेश गायकवाड)

नुकतेच काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भिगवन शेटफळ गटातील नागरिकांना एकच प्रश्न उद्भवत आहे नेमके कोणाचे तिकीट कोणत्या पक्षातून,कोण उभे असणार, कोणता चेहरा असणार, कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून देखील चित्र स्पष्ट झालेले नाही.

भिगवन शेटफळ गटामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार निवडून आला होता. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भिगवन शेटफळ गटामध्ये उमेदवार व सत्ता होती. पण सद्याला भिगवण शेटफळ गटामध्ये खूप मोठे चित्र बदलले आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक चर्चेचा विषय असणारे हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे असणारे निष्ठावंत म्हणून ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलेले पराग जाधव यांनी अलीकडच्या काळामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात आले असून त्यामुळे त्यांचा संपर्क दत्तात्रय भरणे यांच्या जवळचा दिसू लागल्याने मध्यंतरीच्या काळामध्ये दत्तात्रय भरणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पराग जाधव यांचा आपल्या पक्षांमध्ये प्रवेशाबद्दल काय आहे? त्यावर ती दत्तात्रय भरणे यांनी सांगितले ते आमच्या सोबत आहेत त्यांचा प्रवेश झाला आहे असे दत्तात्रय भरणे यांनी सूचक वक्तव्य त्यावेळेस केले. या वक्तव्यानंतर भिगवण शेटफळ गटामध्ये अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांच्या भुवया उंचावल्या व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस होऊ लागल्याचे चित्र पुढे येऊ लागले.विविध चर्चा व मीटिंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होऊ लागल्या. त्यामुळे विविध चर्चांना उधान येऊ लागले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या पत्नी सारिका बंडगर हे इच्छुक आहेत ,माजी भिगवन ग्रामपंचायत सरपंच हेमाताई माडगे हे इच्छुक आहेत, मदनवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अश्विनीताई बंडगर हे इच्छुक आहेत, तसेच युवा नेते स्वप्निल बंडगर यांच्या पत्नी सोनाली बंडगर हे इच्छुक आहेत तसेच माजी पंचायत समिती सदस्य मेघना बंडगर इच्छुक ,माजी सरपंच अश्विनी शेंडगे हे इच्छुक आहेत असे मातब्बर उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे भिगवण शेटफळ गटातील या इच्छुक उमेदवारांपैकी उमेदवारी कोणाला देणार का नव्याने पक्षांमध्ये येणारे उमेदवार यांना उमेदवारी मिळणार याकडे भिगवनकरांचे लक्ष लागले आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!