इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी कायम – वैध मापन शास्त्र विभागाकडून सविस्तर खुलासा

अपनी भाषा में पढ़े! Translate

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी कायम – वैध मापन शास्त्र विभागाकडून सविस्तर खुलासा

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

केंद्र शासनाच्या उपभोक्ता मामले मंत्रालयाने 18 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनंतर वजने व मापे पडताळणीचा कालावधी एक वर्षांवरून दोन वर्षांचा करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसारित झाले. मात्र या वृत्तामुळे विशेषतः व्यापारी वर्गामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या पडताळणीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

या संदर्भात वैध मापन शास्त्र सर्वसाधारण नियम, 2011 मधील नियम 27 अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणा स्पष्ट करताना पुणे विभागाचे सहनियंत्रक वैध मापन शास्त्र विलास पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाने केलेली सुधारणा ही सर्व प्रकारच्या वजने व मापे, लांबी मोजण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, टेप, बीम स्केल, काउंटर मशीन तसेच पेट्रोल-डिझेल विक्रीसाठी वापरण्यात येणारे डिस्पेन्सर यांच्यासाठी लागू आहे. या उपकरणांच्या पडताळणीचा कालावधी आता एक वर्षाऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला आहे.

तथापि, इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या पडताळणी कालावधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, घाऊक व्यापारी, हॉटेल्स, उद्योग, गोदामे तसेच अन्य सर्व ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची पडताळणी पूर्वीप्रमाणे दरवर्षी करणे अनिवार्य राहणार आहे. यामागचा उद्देश ग्राहक हिताचे संरक्षण करणे व व्यवहारात पारदर्शकता राखणे हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वेळेत पडताळणी न केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर वैध मापन शास्त्र कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे कोणताही गैरसमज न ठेवता सर्व संबंधित व्यापाऱ्यांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची नियत कालावधीत पडताळणी करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाने केले आहे.

या खुलाशामुळे व्यापारी वर्गातील संभ्रम दूर झाला असून, ग्राहक व व्यापारी दोघांच्या हितासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे विभागाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!