तांदुळवाडीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी..!
माढा/प्रतिनिधी (अजिनाथ कनिचे)
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथे स्वराज्य संकल्पिका राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 428 वी जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गावच्या मध्यवर्ती ठिकाणी उपस्थित महिलांच्या हस्ते जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शांतीलाल गवळी,मा.चेअरमन अतुल गवळी,उद्योजक अक्षय परबत, नागनाथ जाधव,युवा नेते दिगंबर गवळी,गणेश परबत,अक्षय जाधव, सविता परबत यांनी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त तमाम शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी सविता परबत,शुभांगी जाधव,दैवशाला गवळी, सुचिता परबत,वैशाली परबत,लोचना गवळी,दिपाली गवळी,राधा माने,ऋषाली उबाळे,सरपंच रणजितसिंह पाटील,स्वाभिमानीचे आजिनाथ परबत,सुभान मुलाणी, वैभव भोसले,वस्ताद संभाजी काटकर,विष्णू अनपट,विराज चव्हाण,अभिजीत परबत,तुकाराम गवळी,परमेश्वर भोसले,धनंजय काटकर,महेश जाधव,संदीप शिंदे, पृथ्वीराज गवळी,कुणाल जाधव, प्रदीप गवळी,संदीप जाधव,श्रीकांत कादे,दत्तात्रय गवळी,दत्तू मुळे,महादेव गवळी,दिलीप गवळी, विराज गुरव,सुरज परबत,बाळासाहेब गवळी,चंद्रकांत गवळी,रमेश गवळी,तुकाराम गवळी,अमोल गवळी,सौदागर जाधव,सोमनाथ गवळी,अर्जुन मुळे,संग्राम गवळी, ज्ञानेश्वर गायकवाड,नितीन परबत,अमित घोलप,सुदर्शन परबत,विपुल भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.
तर जि.प.प्रा.आदर्श शाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट व उपाध्यक्षा सौ.अलका गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका पल्लवी राक्षे व सहशिक्षक किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले.
