खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत ‘मुंदडा फॅक्टर’ प्रभावी : सभासदांचा वाढता ओघ, विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल
अमळनेर : विक्की जाधव
खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत पंकज मुंदडा हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, फेलो-पेट्रन तसेच सर्वसामान्य सभासदांमधून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा निवडणुकीचे चित्र बदलणारा ठरत आहे. प्रचारादरम्यान विविध ठिकाणी होत असलेली भेट, थेट संवाद आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, निवडणुकीत ‘मुंदडा फॅक्टर’ निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्पष्ट भूमिका, अभ्यासू नेतृत्व आणि संस्थात्मक विकासाचा अजेंडा संस्थेच्या हितासाठी ठोस भूमिका घेणारे, अभ्यासू आणि शिस्तबद्ध नेतृत्व म्हणून पंकज मुंदडा यांची ओळख आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे आणि खानदेश शिक्षण मंडळाला अधिक सक्षम व पारदर्शक बनवणे हा त्यांचा विकासात्मक अजेंडा सभासदांमध्ये विशेष विश्वास निर्माण करत आहे. ‘काम बोलते’ या तत्त्वावर आधारित त्यांची कार्यशैली मतदारांना आकर्षित करत आहे.
या निवडणुकीत फेलो-पेट्रन सभासदांचा कल अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, पंकज मुंदडा यांच्या बाजूने वाढत चाललेला सभासदांचा ओघ हा त्यांच्या विजयाचा ठळक संकेत मानला जात आहे. सकारात्मक वातावरण, संघटित पाठिंबा आणि वाढता प्रभाव पाहता, खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत ‘पंकज मुंदडा’ नाव निर्णायक भूमिकेत राहील, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त होत आहे.