खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत ‘लालू सैनानी’ यांचेवर : फेलो-पेट्रन व सभासदांचा वाढता विश्वास म्हणजेच विजयाची नांदी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत ‘लालू सैनानी’ यांचेवर : फेलो-पेट्रन व सभासदांचा वाढता विश्वास म्हणजेच विजयाची नांदी.

 

अमळनेर : विक्की जाधव 

खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले लालचंद (लालू) सैनानी हे सध्या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत असून, फेलो-पेट्रन व सभासदांमधून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, शिक्षण मंडळात ‘सैनानी’ नावाची सकारात्मक लाट तयार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

अनुभव, पारदर्शकता आणि संस्थेच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व संस्थेशी अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडलेले, शांत पण ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून लालू सैनानी यांची ओळख आहे. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारी त्यांची कार्यशैली, शिक्षणाच्या दर्जावर भर, शिक्षक-कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि संस्थेच्या आर्थिक शिस्तीबाबतची स्पष्ट भूमिका यामुळे फेलो-पेट्रन तसेच सामान्य सभासदांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास अधिक बळावत आहे. या निवडणुकीत फेलो-पेट्रन सभासदांचा कल निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत असून, बहुसंख्य सभासद लालू सैनानी यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र आहे. एकूणच वाढता प्रभाव, सभासदांचा ओघ आणि सकारात्मक वातावरण पाहता, खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत लालचंद (लालू) सैनानी यांचा विजय आता केवळ चर्चा न राहता निश्चिततेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!