खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीत पंकज मुंदडे यांचे वर्चस्व; अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत आघाडीवर

अपनी भाषा में पढ़े! Translate

खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीत पंकज मुंदडे यांचे वर्चस्व; अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत आघाडीवर

 

अमळनेर : विक्की जाधव 

खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रिवार्षिक निवडणुकीत कार्यकारी सदस्यपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले पंकज गोविंद मुंदडे सध्या संपूर्ण मंडळात चर्चेचा विषय ठरत आहेत. फेलो, पेट्रन व वाईस पॅटर्न सभासदांमध्ये त्यांना मिळणारी वाढती पसंती पाहता त्यांचे वर्चस्व कायम राहणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. स्पष्ट भूमिका, सर्वसमावेशक विचारसरणी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी ठोस काम करण्याची तयारी यामुळे पंकज मुंदडे यांच्याकडे सभासदांचा ओढा वाढताना दिसत आहे.

सामाजिक चळवळीत अग्रेसर व शांत, संयमी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले गोविंददादा मुंदडे यांचे चिरंजीव म्हणून पंकज मुंदडे यांनीही कार्याची परंपरा पुढे नेत विश्वासार्हता निर्माण केली आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण, कार्यक्षम व्यवस्थापन आणि सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती यामुळे खान्देश शिक्षण मंडळाच्या सभासदांत त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणूनही पंकज मुंदडे यांची ताकद निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!