रढावण राजोरे ग्रामपंचायतीत सौ. रेखा अधिकार पाटील यांची उपसरपंचपदी निवड
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर तालुक्यातील गृप ग्रामपंचायत रढावण राजोरे येथे झालेल्या विशेष बैठकीत सौ. रेखा अधिकार पाटील यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनिमित्त गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आदर्श लोकनियुक्त सरपंच श्री. भैयासाहेब वाल्मीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी ग्रामसेविका श्रीमती अमिता राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कमलाकर निंबा पाटील, तुकाराम मानसिंग सोनवणे, सौ. वैशाली समाधान पाटील, सौ. स्वाती पंकज पाटील, सौ. रजूबाई छोटु पाटील, सौ. दिपाली प्रविण अहिरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अजबराव सिताराम पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सौ. रेखा पाटील यांचे अभिनंदन करून ग्रामविकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.