शिरपूरमध्ये बेकायदेशीर खाद्य स्टॉल्सचा सुळसुळाट; अतिक्रमण, नियमभंग आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूरमध्ये बेकायदेशीर खाद्य स्टॉल्सचा सुळसुळाट; अतिक्रमण, नियमभंग आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

शिरपूर शहरात रस्त्यांवर, बसस्थानक व कॉलनी परिसरात वाढत चाललेली बेकायदेशीर खाद्यपदार्थांची स्टॉल्स आणि गाड्यांची संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुख्य चौक, शहरातील प्रमुख बाजारपेठ, बसस्थानक परिसर, तसेच रहदारीने गजबजलेल्या रस्त्यांवर या स्टॉल्सचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, वाहतुकीत गंभीर अडथळे निर्माण होत आहेत. पादचारी मार्ग आणि रस्त्याच्या कडेला परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या गाड्यांमुळे कोंडी निर्माण होत असून, रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहनांनाही योग्यरित्या मार्ग मिळण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

विशेष म्हणजे, या स्टॉलधारकांकडे नगरपालिकेची गरजेची एनओसी, ट्रेड परवाना किंवा अन्न व्यवसायासाठी आवश्यक प्रमाणपत्र नसल्याची चर्चा आहे. काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी शहरात येऊन परवान्यांशिवाय व्यवसाय सुरु केल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नियमांचे पालन न करता व्यवसाय सुरू केल्याने केवळ आर्थिक असंतुलन नव्हे, तर अन्नसुरक्षेचा प्रश्नही गंभीर स्वरूपात समोर येतो आहे.

याशिवाय, अनेक खाद्य गाड्यांवर घरगुती तसेच खाजगी गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या सिलेंडरचा व्यापारी वापर हा कायद्याने दंडनीय असून, यामुळे आग लागण्याचा धोका कायम असल्याचे अग्निशमन विभागाच्या सूत्रांकडून समजते. गर्दीच्या ठिकाणी अशा सिलेंडरचा वापर नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणारा आहे.

या सर्व प्रकाराकडे नगरपालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरभर रंगत असून, प्रशासनाने नेमकी कोणती कारवाई केली याबाबत नागरिक स्पष्टता मागत आहेत. नियमांचे उल्लंघन, अतिक्रमण, सुरक्षा धोक्यात आणणे आणि वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा – या सर्वांचा विचार करता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील शिस्तबद्ध वाहतुकीसाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे, अशी मागणी शहरातील जनतेकडून जोरदारपणे व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!