राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज आणि विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
(निलेश गायकवाड)
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज भिगवण (थोरात नगर) ता. इंदापूर , जि. पुणे. या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. २७/१२/२०२७ रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयप्रकाश खरड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. सारिका मामी दत्तात्रय भरणे उपस्थित होत्या. तसेच अनुष्काताई भरणे, भिगवण ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, उसरपंच, सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बापुराव थोरात, संस्थेचे सचिव मा. श्री. विजय (भैय्या) थोरात, खजिनदार मा. श्री. संतोष थोरात, सदस्य अजय थोरात, नंदकिशोर थोरात संचालिका सौ. सुशीलाताई थोरात, सौ. संगीताताई थोरात, सौ. सुनीताताई थोरात, सौ. पुजाताई थोरात, सौ. सोनालीताई थोरात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना थोरात, I T I चे प्राचार्य मोहिते सर व आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना थोरात मॅडम यांनी शाळेचे प्रास्ताविक सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीतगायन, समूह नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून पर्यावरण वाचवा पाणी आडवा पाणी जिरवा अन्नाची कदर करा विकसित भारत महाभारत थीम भारुड अशा विविध संदेशात्मक कलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉ. जयप्रकाश खरड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ॲड. महेशदादा देवकाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उज्वला वाघ आणि सौ. शुभांगी जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पद्मसिंह भोसले सर आणि सौ कावेरी नायब मॅडम यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.