आजच्या युवकांनी फुले ,शाहू ,आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत—–- प्रा. डॉ. प्रज्ञा लामतुरे

अपनी भाषा में पढ़े! Translate

आजच्या युवकांनी फुले ,शाहू ,आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत—–- प्रा. डॉ. प्रज्ञा लामतुरे

(निलेश गायकवाड)

“आजची तरुण पिढी मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी गेली आहे . कारण माणसाला फक्त फॉरवर्ड आणि डिलीट एवढेच माहिती आहे. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, श्रद्धा यांच्यात आपण अडकून राहिलो आहे. तरुणाईला चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव राहिली नाही” अशी खंत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर या संस्थेच्या इंदापूर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व मराठी विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.प्रज्ञा लामतुरे मॅडम यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना “आजची तरुणाई” या विषयावर त्या बोलत होत्या. डॉ. प्रज्ञा लामतुरे पुढे म्हणाल्या, आज फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. कारण आज घटनेमधील तरतुदी नसत्या तर आपण अनुदानित शिक्षण घेऊ शकलो नसतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिकसळ गावातील प्रा. नवनाथ सावंत सर होते .

व्याख्यानमालेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक डॉ. अनिल बनसोडे सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी- प्रा.पद्माकर गाडेकर , प्रा विनोद भुजबळ, प्रा.सारिका पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

याप्रसंगी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील प्रा.धनाजी मत्रे , डिकसळ गावातील ग्रामस्थ गवळी , रासेयो स्वयंसेवक आणि स्वयंसेविका आदी उपस्थित होते.
होते .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.नवनाथ सावंत सर म्हणाले, “शिक्षण हे अमृत आहे . शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून चांगले गुण आत्मसात करावेत. तर खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध होईल.”
यावेळी रहेमत शेख या विद्यार्थिनींनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन तनुजा मोहोळकर हिने केले. आभार काजल गायकवाड हिने मांनले कार्यक्रमासाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!