शिक्षण, संस्कार, सन्मानाचा त्रिवेणी संगम : अमळनेरमध्ये कर्तृत्ववान शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा थाटात संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील टाऊन हॉल, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे परीट धोबी समाजातील कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला, तर विविध परीक्षांत व क्षेत्रांत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशाला नवी दिशा देण्यात आली. हा सोहळा समाजासाठी अभिमानास्पद ठरला.
कार्यक्रमास विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा. श्री. सुहासजी रोकडे, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. प्रा. राजेशजी जाधव, माजी प्राचार्य मा. प्रा. डॉ. अरुणजी कोचर, मा. प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, लोकमान्य टिळक शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव मा. विवेकानंदजी भांडारकर, माजी उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. पी. जे. जोशी, माजी उपाध्यक्ष ग. स. बँक जळगाव जिल्हा मा. श्यामकांतजी भदाणे, समाज कल्याण निरीक्षक धुळे मा. शशांक अरुण जाधव तसेच मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. विजयसिंग पवार (पू. साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी सेवा मंडळ मा. विवेकजी ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष सर्वभाषिक धोबी महासंघ मा. सुरेशजी ठाकरे, जळगाव जिल्हा धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष मा. कैलासजी शेलोळे, जळगाव जिल्हा सर्वभाषिक धोबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. अरुणजी राऊत, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष मा. प्रभाकरजी खर्चे व सचिव मा. राजेंद्रजी सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सर्वभाषिक धोबी महासंघ मा. श्यामजी वाघ, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष मा. दिपकजी बाविस्कर, प्रदेश सचिव सर्वभाषिक धोबी महासंघ मा. शंकरराव निंबाळकर, फेगडे उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावदचे प्राचार्य मा. गणेशजी बच्छाव, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष मा. अरुणजी सपकाळे, पू. साने गुरुजी ग्रंथालय अमळनेरचे अध्यक्ष मा. दिलीपजी सोनवणे व चिटणीस मा. प्रकाशजी वाघ, युवा परीट धोबी मंडळ अमळनेरचे अध्यक्ष मा. रविंद्रजी जाधव, तालुका अध्यक्ष अमळनेर धोबी समाज मा. गंगारामजी वाल्हे, भाजपा शहराध्यक्ष अमळनेर मा. उमेशजी वाल्हे तसेच सामाजिक कार्यकर्ता मा. अविनाशजी जाधव यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिक्षक हे समाज घडविणारे शिल्पकार असून विद्यार्थ्यांचे यश हेच समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचे द्योतक असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत संस्कार, मूल्ये व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा परीट धोबी मंडळ अमळनेर, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय अमळनेर तसेच डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालय व वाचनालय अमळनेर यांनी मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाजबांधव उपस्थित होते.