ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे “मै भी कृष्ण”चे सादरीकरण करत सामाजिक जागरूकतेचा संदेश देत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे “मै भी कृष्ण”चे सादरीकरण करत सामाजिक जागरूकतेचा संदेश देत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

 

अमळनेर : विक्की जाधव 

ॲड .ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल संस्काराचे मोल रुजवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यानुसारच दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीकृष्ण जीवनावर आधारित संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्षा ॲड.ललिता पाटील, संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक श्री पराग पाटील व संचालिका श्रीमती देवेश्री पाटील, लताई आदिमजन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. शुभांगी चव्हाण,डॉ. प्रतिभा मराठे तर विशेष अतिथी म्हणून पालकप्रतिनिधी श्री. कमल ओझा,प्राचार्य डॉ. निरज चव्हाण आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

या आयोजनाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील सर तर अध्यक्ष पद ऍड. ललिता पाटील मॅडम यांनी भूषविले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर सर्व सन्माननीय अतिथींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात प्रविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात बारावी परीक्षेत जळगांव जिल्यातुन तृतीय क्रमांक आलेला विद्यार्थी, ITO परीक्षेत राज्यातून प्रथम येणारे विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, जिल्हा स्तरीय विद्यार्थी, ISRO मध्ये निवड झालेला विद्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेंष उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेला गोल्डन स्कूल ऑफ द इयर अवॉर्ड मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ . नीरज चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी वार्षिक स्नेह संमेलनत श्रीकृष्ण जीवनाची आजच्या युगाशी सांगड घालण्यात आली आणि प्रत्येक परिस्थितीत श्रीकृष्णसारखा वागून योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवून आपल्यातला कृष्ण कसा शोधावा हे नृत्यनाटिकेद्वारे विध्यार्थ्यांनी मांडले. नर्सरी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आणि आपल्या कलाविष्काराने सर्वाना मंत्रामुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कला शिक्षक आणि इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले परंतु शिक्षिका राजकमल कोळी व सोनाली कोळी यांनी विशेष कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक श्री विलास पाटील व कु. मुस्कान डिंगरे यांनी केले.आभार प्रदर्शन शिक्षक जावेद पिंजारी यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!