खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत ‘शिंदे फॅक्टर’ चर्चेत डॉ. अनिल शिंदेंचा विजयाचा सूर अधिक बुलंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत ‘शिंदे फॅक्टर’ चर्चेत डॉ. अनिल शिंदेंचा विजयाचा सूर अधिक बुलंद

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच अमळनेर शहरात डॉ. अनिल शिंदे यांचे नाव केंद्रस्थानी आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय चळवळीत सक्रिय असलेले, मनमिळाऊ स्वभावाने सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे डॉ. शिंदे यांचा अमळनेरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठा जनाधार आहे. उच्च शिक्षित आणि अनुभवी डॉक्टर संचालकपदी येणार, या अपेक्षेने शिक्षणप्रेमी नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणूक रणधुमाळीत अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असली तरी “डॉ. अनिल शिंदे” हे नाव सर्वप्रथम घेतले जात असल्याचे चित्र आहे. विविध पॅनल्स, फेलो आणि पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज लक्षात घेता डॉ. शिंदे यांच्याकडे विश्वासाने पाहिले जात आहे. त्यांचा अनुभव, संयमी स्वभाव आणि लोकांशी असलेला थेट संपर्क हीच त्यांच्या लोकप्रियतेची खरी ताकद मानली जात आहे.

निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच डॉ. अनिल शिंदे यांचा विजय जवळपास निश्चित असल्याची चर्चा अमळनेर व परिसरात रंगू लागली आहे. “संस्थेसाठी काम करणारा माणूसच संचालक व्हावा” ही भावना मतदारांमध्ये बळावत असून, त्यामुळेच शिंदे यांचा ‘धबधबा’ कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे हे निर्णायक चेहरा ठरणार, यात शंका नाही, असे राजकीय व शैक्षणिक वर्तुळात बोलले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!