गडहिंग्लज पालिका निवडणुकीत परीट दाम्पत्याचा दणदणीत विजय

अपनी भाषा में पढ़े! Translate

गडहिंग्लज पालिका निवडणुकीत परीट दाम्पत्याचा दणदणीत विजय

गडहिंग्लजमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उदय परीट आणि त्यांच्या पत्नी रूपाली परीट या दाम्पत्याने दोन्ही प्रभागांतून मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी उदय परीट यांच्यावर विश्वास टाकत त्यांना दोन्ही प्रभागांतून उमेदवारी दिली होती. निवडणुकीआधीच उदय परीट यांनी दोन्ही प्रभागांतून लढण्याचे जाहीर केले होते.अनेक नगरसेवकांना स्वतःच्या एकाच प्रभागात विजय मिळवताना संघर्ष करावा लागतो, मात्र उदय परीट यांनी दोन्ही प्रभागांची निवडणूक अतिशय सहजतेने हाताळली आणि घवघवीत यश मिळवले.
प्रभाग ७ मधून रूपाली परीट यांचा विजय: येथे नरेंद्र भद्रापूर यांनी मोलाची साथ दिली.
प्रभाग ११ मधून उदय परीट यांचा विजय: येथे नागेश चौगुले यांनी भरघोस मदत केली.

उदय परीट यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सामाजिक कार्य हे त्यांच्या विजयाचे मोठे कारण ठरले. ते कोणताही दिखावा न करता शांतपणे काम करतात. कोणाच्या घरात दुख:द घटना घडली की ते तात्काळ हजर राहून सर्व अंत्यविधी पूर्ण करूनच परततात. तसेच इतर सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमी आघाडीवर असतात. या पार्श्वभूमीवर मतदारांनीही त्यांना भरघोस साथ दिली.गडहिंग्लज नगरपालिकेत पती-पत्नी एकत्र नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा हा दुर्मीळ आणि प्रेरणादायी अध्याय आहे.
या दाम्पत्याला विजयाबद्दल मनापासून अभिनंदन!

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!