तरुण हातात शहराचा कारभार; सुयोग धनगरांच्या विजयाची जिल्हाभर चर्चा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

तरुण हातात शहराचा कारभार; सुयोग धनगरांच्या विजयाची जिल्हाभर चर्चा..

२४ वर्षांचा नगरसेवक! अमळनेर नगरपरिषदेत सुयोग धनगरांचा दमदार प्रवेश..

 

अमळनेर : विक्की जाधव.

२४ वर्षीय सुयोग नाना धनगर सर्वात तरुण नगरसेवक म्हणून विजयी नगरपरिषद निवडणुकांची धामधूम अंतिम टप्प्यात असतानाच अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेना (एकनाथराव शिंदे गट) चे सर्वात तरुण उमेदवार सुयोग नाना धनगर यांनी दणदणीत विजय मिळवत नगरसेवकपद पटकावले आहे. केवळ २४ व्या वर्षी नगरसेवकपदी निवडून येणारे सुयोग धनगर हे अमळनेरच नव्हे तर तालुक्यातील सर्वात तरुण लोकप्रतिनिधी ठरले असून, त्यांच्या विजयाने राजकीय वर्तुळात तरुण नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

सुयोग धनगर यांच्या विजयामागे त्यांचा जनसंपर्क, समाजकार्याची ओळख आणि साधा-सहज स्वभाव हीच खरी ताकद ठरल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे. अमळनेर शहरातच नव्हे तर जिल्हाभरात त्यांच्या कार्यशैलीची आणि विचारांची दखल घेतली जात आहे. प्रभागातील विकासात्मक प्रश्नांबाबतची त्यांची तळमळ आणि तरुणाईशी असलेली नाळ यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे चित्र दिसून येते. “कामातूनच ओळख निर्माण करायची” ही भूमिका नागरिकांमध्ये विशेष भावली असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लढवलेल्या या निवडणुकीत सुयोग धनगर यांच्याकडे आधीपासूनच सर्वात तरुण उमेदवार म्हणून पाहिले जात होते. आता ते विजयी झाल्याने अमळनेर नगरपरिषद २०२५ मधील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून त्यांची ओळख पक्की झाली आहे. त्यांच्या या यशामुळे तरुणांना राजकारणात सक्रिय होण्याची नवी प्रेरणा मिळाली असून, अमळनेरच्या राजकारणात तरुणाईचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!