अमळनेरमध्ये संघटन बळकटीचा निर्धार शिवसेना कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये संघटन बळकटीचा निर्धार शिवसेना कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान.

 

अमळनेर : विक्की जाधव.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज नवनिर्वाचित व माजी लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा प्रसंग उत्साहात साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेवक तथा माजी नगरसेवक दादासाहेब पवार, माजी नगरसेवक मुन्नाभाऊ शर्मा तसेच विद्यमान नगरसेविका कल्पना शर्मा यांचे पती यांचा तालुकाप्रमुख श्री. सुरेशभाऊ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

या वेळी पुणे येथून आलेले शिवसेना कार्यकर्ते अनिल पाटील, जिजा पाटील, विनोद पाटील यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत व्हावी यासाठी तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न व पुढाकार सुरू असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. “संघटन हाच खरा बळाचा आधार” या भावनेतून कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी हा व्यक्तींचा सन्मान नसून, शिवसेनेच्या संघटनात्मक शक्तीचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आगामी काळात अमळनेर तालुक्यात शिवसेना अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास तालुकाप्रमुख सुरेश पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!