राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त निंबोडी येथे स्वच्छता करत केले अभिवादन
(निलेश गायकवाड)
आज निंबोडी ग्रामपंचायत च्या वतीने “संत गाडगेबाबा पुण्यतिथी” निमित्त व मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत परिसर व मंदिर परीसर गावातील चौक स्वच्छता अभियान राबवले गेले आहे.
स्वच्छता अभियान परिसरातील स्वच्छता करण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सरपंच – संतोष सोनवणे यांनी सांगितले व आपण इथून पुढेही पंधरा दिवसातून एकदा गावातील स्वच्छता करूया असे सांगण्यात आले. त्यावेळेस स्वच्छता अभियानास सहकार्य आरोग्य विभागाचे कर्मचारी जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक दोडमीसे सर, तांबोळी सर, छत्रपती हायस्कूलचे मुख्याध्यापक गोवेकर सर, छत्रपती हायस्कूलचे शिक्षक घाडगे सर, जाधव सर सर्व कर्मचारी बंधू विद्यार्थी अंगणवाडीच्या माझ्या भगिनी चंपा खडके, सोनाली मोहिते, सुतार मॅडम, आरोग्य उपकेंद्राचे कापसे उपकेंद्राचा स्टाफ ग्रामपंचायतचे कर्मचारी मंगेश खंडागळे ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.