अमळनेरात राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम
अमळनेर, २० डिसेंबर : राष्ट्रसंत संत गाडगे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संत गाडगेबाबा उद्यानातील स्मारकाचे तसेच संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व माल्यार्पण सोहळा पार पडला.”गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाजबांधव अरुण अमृत वाघ, माजी नगरसेवक अविनाश जाधव, परशुराम महाले, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, प्रा. अनिल वाल्हे, प्रा. अनिल पवार, अशोक येशी, अनिल मांडोळे, डॉ. हिम्मत सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले ख्यातनाम समाजसुधारक होते. दीन-दलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या कीर्तनातून सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि अनिष्ट परंपरांवर टीका करत शिक्षण, स्वच्छता व चारित्र्याची शिकवण दिली. “सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, अंधश्रद्धांना बळी पडू नका” अशी त्यांची शिकवण होती. “देव दगडात नव्हे, तो माणसांत आहे” हा संदेश त्यांनी समाजमनावर ठसवला. समाजकार्यासाठी मिळालेल्या देणग्यांतून त्यांनी अनाथालये, धर्मशाळा, आश्रम आणि विद्यालये उभी केली. यावेळी विनोद जाधव, अनिल वाघ, गणेश नेरकर, भरत जावडेकर, दीपक सुर्यवंशी, मनोज चित्ते, दीपक वाल्हे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.राष्ट्रसंत गाडगे महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
