अजिंक्य तुमचे संघटन कौशल्य दाद देण्यासारखे आहे, तुझे काम हे कौतुकास्पद आहे;कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
(निलेश गायकवाड )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अजिंक्य माडगे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या वाढदिवसानिमित्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहत अजिंक्य माडगे यांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली. व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाढदिवसानिमित्त भिगवन व परिसरातील हजारो नागरिकांनी व महिलांनी व युवकांनी सक्रिय कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अजिंक्य माडगे यांनी युवकांचे संघटन मजबूतपणे राबविली आहे तसेच त्यांची आई सौ हेमाताई माडगे यांनी भिगवन ग्रामपंचायत च्या सरपंच पदी भिगवन परिसरामध्ये विविध सामाजिक कामे करून जनसेवा केली असल्याचे मंत्री भरणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अजिंक्य मांडगे यांनी शेवटी बोलताना सर्वांचे आभार देखील मानले व येणाऱ्या काळात देखील आपण समाजसेवेमध्ये झोकून काम करणार असल्याचे सांगितले.