धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती; विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

अपनी भाषा में पढ़े! Translate

धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती; विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्श

 

अमळनेर विकी जाधव.

येथील धनदाई महाविद्यालयात रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाने झाली. ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील, दीपक शेलार, जयेश मोर आणि देवेंद्र मोर यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही./एड्सविषयी मूलभूत माहिती, संसर्गाची कारणे तसेच उपचार पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “एकजुटीने एच.आय.व्ही.ला लढा देऊ, नवे परिवर्तन घडवू या” या घोषवाक्याने या वर्षाच्या उपक्रमाला अर्थपूर्ण दिशा मिळाली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी किसान महाविद्यालयाचे डॉ. माणिक बागले, मारवड महाविद्यालयाचे डॉ. जितेंद्र माळी आणि अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेली माहिती मित्रपरिवार आणि समाजात पोहोचवण्याचे आवाहन केले. उपक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी डॉ. महादेव तोंडे, डॉ. लीलाधर पाटील, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. रवींद्र चौधरी, डॉ. भगवान भालेराव आदींनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी जनजागृतीचे हे धडे प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!