‘प्रताप’ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘प्रताप’ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली.

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात करिअर काउंसिलिंग सेंटरच्या अभ्यासिकेत भारतीय संविधानाचे शिल्पकार, कायदे तज्ञ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या महान कार्याला स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांची नितांत गरज आजच्या पिढीला आहे, हा संदेश या प्रसंगी देण्यात आला.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, करिअर काउंसिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, प्रा. दिनेश भलकार, डॉ. आर. सी. सरवदे यांच्यासह विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांना अनुसरण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!