वाळू माफियाची वाढली दादागिरी मांडळात महसूल पथकावर हल्ला..

अपनी भाषा में पढ़े! Translate

वाळू माफियाची वाढली दादागिरी मांडळात महसूल पथकावर हल्ला..

मांडळ शिवारात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर गावठी कट्टा लावून धमकी दिल्याची धक्कादायक घटना ७ रोजी पहाटे घडली. पांझरा नदी परिसरात वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी व ट्रॅक्टर  पाच–सहा जण मोटरसायकलवर तर दहा–बारा जण लाठी–काठ्यांसह घटनास्थळी धावून आले. यावेळी ग्राममहसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्याला मार लागला तर मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळावर गावठी कट्टा लावून जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी वाहने पळवून नेली. अवैध वाळू माफियांचा हा निर्भय दहशतवाद पाहता महसूल पथकाने लगेच अमळनेर येथे पोहोचून तक्रार नोंदवली.

घटनेनंतर मारवड पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यासह महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या आदेशानुसार पाठवलेल्या पथकावर झालेला हा हल्ला प्रशासनाच्या कारवाईला खुले आव्हान मानला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!