तब्बल १२ लाखांचे दागिने परत करून लॉन्ड्री व्यावसायिकाने जिंकली मनं

अपनी भाषा में पढ़े! Translate

तब्बल १२ लाखांचे दागिने परत करून लॉन्ड्री व्यावसायिकाने जिंकली मनं
प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श – सखाराम खिस्ते यांचे सर्वत्र कौतुक

बाणेर (पुणे), दि. ५ डिसेंबर २०२५
कपड्यांच्या पिशवीत चुकून गेलेला तब्बल १२ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा बटवा परत करून बाणेर येथील लॉन्ड्री मालक सखाराम खिस्ते यांनी प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श घालून दिला.घटना अशी घडली की, सुप्रीम वेलनेसिया सोसायटीतील एका महिलेने नेहमीप्रमाणे इस्त्रीसाठी कपडे नंदनी लॉन्ड्रीमध्ये दिले. मात्र, त्या पिशवीत अनवधानाने १२ लाखांचे मौल्यवान दागिने असलेला बटवा ठेवला गेला. दुसऱ्या दिवशी घरी दागिने सापडत नसल्याने महिलेची झोप उडाली. घाबरून त्या थेट लॉन्ड्रीत पोहोचल्या.तेथे त्यांना सुखद धक्का बसला. लॉन्ड्री मालक सखाराम खिस्ते यांनी पिशवी उघडताच दागिन्यांचा बटवा पाहिला आणि तो सुरक्षित ठेवला होता. कोणतीही मोह-माया न बाळगता त्यांनी तो बटवा महिलेच्या हवाले केला. हरवलेली मौल्यवान संपत्ती अक्षरशः परत मिळाल्याने महिला व त्यांचे कुटुंबीय भावूक झाले आणि खिस्ते यांचे मनापासून आभार मानले.या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बाणेर येथील मुरकुटे गार्डनमधील आनंदवन ग्रुपच्या वतीने सखाराम खिस्तेस्ते व पुणे लॉन्ड्री व्यावसायिक संघाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.प्रामाणिकपणा हा खरा दागिना आहे, हे सखाराम खिस्ते यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
अशा व्यक्तींमुळेच समाजात विश्वास टिकून आहे.
सखाराम खिस्ते यांना मनापासून सलाम!

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!