आज मी आमदार नाही, तरीही माझ्यासोबत ठाम उभी असलेली जनता हीच माझी खरी मायबाप,” मा. आ. शिरीष चौधरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आज मी आमदार नाही, तरीही माझ्यासोबत ठाम उभी असलेली जनता हीच माझी खरी मायबाप,” मा. आ. शिरीष चौधरी बोलतांना झाले भावुक 

 

अमळनेर: विक्की जाधव.

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तापमान चांगलेच चढले असून, बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेने या राजकीय रंगमंचाला जणू नवा पट दिला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या प्रचारार्थ अमळनेरत प्रथमच आलेल्या संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेला जनसागर उसळला होता. दुपारी ३ वाजता झालेली सभा म्हणजे उत्साहाचा, घोषणांचा आणि ठसठशीत उपस्थितीचा अद्वितीय मेळावा होता.

सभेत सर्वाधिक चर्चेत राहिला तो क्षण, जेव्हा माजी आमदार शिरीषदादा चौधरी बोलताना भावुक झाले.

“अमळनेरचा सर्वांगीण विकास मी आमदार असताना झाला… आज मी आमदार नाही, तरीही माझ्यासोबत ठाम उभी असलेली जनता हीच माझी खरी मायबाप,” असे म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून उपस्थितांमध्येही क्षणभर भावनिक शांतता पसरली. “डॉ. परीक्षित यांना नगराध्यक्ष केले तर अमळनेरच्या विकासाचा पालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी जाहीर केला.

यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनीही जनता आणि शिरीषदादांच्या नात्यातील बंध जिवंत करत. नुकतीच पितृछत्र हरपलेले “शिरीषदादा एवढे भावुक मी पहिल्यांदाच पाहिले… अमळनेरने शिवसेनेचा नगराध्यक्ष दिला तर शहर सुजलाम-सुफलाम करण्याची जबाबदारी आमची,” असे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात डॉ. परिक्षीत यांनी केलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत “हा अमळनेरचा खरा भूमिपुत्र आहे,” असे गौरवोद्गार काढले. उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला भरीव निधी मिळेल, प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी खात्री स्वतः डॉ. बाविस्कर यांनी जनतेला दिली.

यावेळी जिल्ह्याभरातील शिवसेनेचे सर्व नामवंत नेते, आमदार, पदाधिकारी, युवा व महिला आघाड्या, आजी-माजी नगरसेवक आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीने अमळनेर शहराने शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवून दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!