“पत्रकारांनो, मी तुमची माफी मागतो… पण शहर विकास आघाडीने दिलेला उमेदवार हा ‘तोडी-पाणी करणारा उमेदवार’ आहे. तो सत्तेवर आला तर नगरपालिका बुडलीच समजा,” नामदार गुलाबराव पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

“पत्रकारांनो, मी तुमची माफी मागतो… पण शहर विकास आघाडीने दिलेला उमेदवार हा ‘तोडी-पाणी करणारा उमेदवार’ आहे. तो सत्तेवर आला तर नगरपालिका बुडलीच समजा,” नामदार गुलाबराव पाटील

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेने या वातावरणात आणखी रंग भरला. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रथमच अमळनेरत आलेल्या संसदीय गटनेते, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या या सभेत जनसागर उसळलेला दिसत होता.

यावेळी ना. गुलाबराव पाटील यांचे तिखट पण धारदार भाषण. होते ते बोलतांना म्हणाले की “पत्रकारांनो, मी तुमची माफी मागतो पत्रकाराचे काम हे एखाद्या घटनेला वाचा फोडण्याचे असते… पण शहर विकास आघाडीने दिलेला उमेदवार हा ‘तोडी-पाणी करणारा म्हणून ओळखला जातो. तो सत्तेवर आला तर नगरपालिका बुडलीच समजा,” असा आरोप करत त्यांनी वातावरण भारावून टाकले.

त्याचबरोबर ते पुढे बोलताना म्हणाले की धनलक्ष्मीचा संदर्भ देत त्यांनी विनोदी फटकाराही मारला  “1 तारीख येतेय… रात्री खाट टाकून बाहेर झोपा, पैसा आलाच तर बिनधास्त घ्या… पण मतदान मात्र डॉक्टरलाच द्या!” कोरोनाकाळातील डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख करत, “सामान्य परिस्थितीतून आलेला, अमळनेरचा खरा भूमिपुत्र म्हणजे डॉ. परिक्षीत,” अशी प्रशंसोद्गार ना. पाटील यांनी काढली. दरम्यान, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी शिरीषदादा चौधरी यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला भरीव निधी मिळेल, प्रलंबित विकासकामांचा अनुशेष भरून निघेल, अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली. सभेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिरीषदादा चौधरी, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे आदी मान्यवरांसह आमदार चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, अमोल पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, अनेक महिला व युवा आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच शिवसेनेचे सर्व आजी-माजी नगरसेवक, जि.प.पं.स. सदस्य, सरपंच, हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीने अमळनेरातील राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!