प्रभाग ३ मध्ये भूमिपुत्राची जोरदार चर्चा; किरण भाऊ बहारे जनतेच्या पसंतीच्या यादीत अव्वल
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 ची चाहूल लागताच प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय रंग तापू लागला आहे. या प्रभागात गेली पंचवीस वर्षे सातत्याने लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत सेवा करणारे किरण भाऊ बहारे (कृष्णा रामसिंग बहारे) हे नाव पुन्हा एकदा जनतेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. स्थानिक पातळीवर दिवस-रात्र फिरत सामान्य नागरिकांशी नाते जपणारा उमेदवार म्हणजे किरण भाऊ, आणि त्यामुळेच प्रभागातील मतदार त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देताना दिसत आहेत.
दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी उमेदवारांविषयी जनतेत नाराजीचे सूर ऐकू येतात. “हा बाहेरचा… तो जळगावचा… हा नंदुरबारचा… मग आमचा खरा भूमिपुत्र कोण?” असा प्रश्न मतदार खुलेआम विचारताना दिसतात. जनतेच्या मनातली स्पष्ट भावना म्हणजे भूमिपुत्र तोच जो शहरात राहतो, लोकांसोबत थांबतो, त्यांच्या संकटात धावून येतो, आणि ही व्याख्या किरण भाऊ बहारे यांच्यावर तंतोतंत लागू होते. त्यामुळेच विरोधकांचे बाहेरगावी असलेले मूळ हे प्रभागात मोठा चर्चेचा विषय बनले आहे.
स्थानिक सेवा, ओळख, नातं आणि विश्वास या चार स्तंभांवर उभा असलेला किरण बहारे यांचा प्रवास हा प्रभाग क्रमांक ३ मधील मतदारांसाठी नव्या उमेदवारांपेक्षा खूपच जवळचा आहे. “गेल्या पंचवीस वर्षांत जे कोणीतरी आमच्यात राहून काम केले, तोच आमचा नेता,” असा सूर जनतेतून सातत्याने उमटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये स्थानिक भूमिपुत्राला प्राधान्य देत किरण भाऊंना निर्णायक आधार मिळेल, अशी जोरदार चर्चा शहरभर रंगत आहे.