प्रभाग 10 मध्ये बदलाची चाहूल  संजय मराठेंची ‘घरवापसी’ निश्चित?

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 10 मध्ये बदलाची चाहूल  संजय मराठेंची ‘घरवापसी’ निश्चित?

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 हे सर्वाधिक चर्चेत असलेलं रणांगण ठरत आहे. गेली अनेक वर्षे प्रभागात एकही ठोस काम न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा माहोल असून, मनीषा ताई संजय मराठे यांच्याबद्दलचा रोष टोकाला पोहोचला आहे. तीन दशकात प्रभागात नवे रस्ते, गटारी, प्रकाशयोजना किंवा शासकीय योजनांचा लाभ यापैकी काहीच दिसून न आल्याने मतदारांमध्ये असंतोषाचे सावट दाटले आहे. इतक्या वर्षे अनुपस्थित राहून निवडणुकीच्या तोंडावरच मत मागण्यासाठी बाहेर पडलेल्या संजय मराठे यांना मतदारांकडून मिळणारा विरोध स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

यावेळी आकडे बोलून, पैसा फेकून निवडणूक जिंकण्याचा खेळ चालणार नाही, असे नागरिकांनी ठरवले असून, प्रभागात बदलाची प्रचंड मागणी आहे. “काम नाही, तर मत नाही” या भूमिकेत राहणाऱ्या नागरिकांनी संजय मराठे यांच्या पुनरागमनाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत संजय मराठे यांची ‘घरवापसी’ निश्चित असल्याचा सूर प्रभागभर उमटताना दिसत आहे. प्रभागाच्या विकासाला तीन दशके अडथळा ठरलेल्या नेतृत्वाविरुद्ध यावेळी जनतेचा कडवा रोष मतदान पेटीतून दिसेल, अशी चर्चा गल्लीबोळांत रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर संजय मराठे यांच्यासमोर उभे ठाकलेले प्रतिस्पर्धी महिला उमेदवार हे प्रभागातील नवा उमेदीचा चेहरा ठरत आहे. समाजकार्य, जनसंपर्क आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रामाणिक वचनांमुळे त्यांची जमेची बाजू अधिक मजबूत झाली आहे. नागरिकांचा वाढता कल आणि संजय मराठे यांचा घटता प्रभाव पाहता प्रभाग क्रमांक 10 मध्ये यावेळी इतिहास बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. “यावेळी विकासाला मत, स्थिरता आणि नवा अध्याय” या भूमिकेतून मतदार मतदान करणार असल्याने संजय मराठे यांची घरवापसी निश्चित मानली जात आहे.

 सविस्तर पुढे

विक्की जाधव, 91750 50300

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!