प्रभाग 13 मध्ये परिवर्तनाची लाट  सुनील महाजनांचा धाडसी निर्णय.. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 13 मध्ये परिवर्तनाची लाट  सुनील महाजनांचा धाडसी निर्णय.. 

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे माजी कर्मचारी सुनील दयाराम महाजन यांनी समाज बदलण्यासाठी, नागरिकांना जागृत करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार व्हीआरएस घेत नोकरीचा मोह बाजूला ठेवत थेट लोकसेवेत उडी घेतली आहे. मोठ्या पगाराची सुरक्षित नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजकार्यासाठी देण्याचा त्यांचा हा निर्णय प्रभागात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

सुनील महाजन यांनी अनेक वर्षे पोलीस खात्यात ईमानदार आणि कर्तव्यदक्ष सेवक म्हणून काम करताना सामान्य जनतेच्या समस्या जवळून अनुभवल्या. प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरिकांची सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी तळमळीने आवाज उठवला. आता नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभाग 13 च्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्याचा त्यांचा निर्धार स्पष्ट आहे. समाजमाध्यमे, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे नागरिकांना जागृत करत सुनील महाजन जनतेच्या प्रश्नांची खरी जाण ठेवणारा उमेदवार म्हणून उदयास आले आहेत.

“सामान्य घरातील, पण असामान्य धाडस असलेला उमेदवार” ही प्रतिमा प्रभागातील मतदारांत सुनील महाजन यांच्या नावासोबत जोडली जाऊ लागली आहे. नोकरीपेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची मानणाऱ्या या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. प्रभाग 13 मध्ये परिवर्तनाची इच्छा प्रचंड असून, सुनील महाजन यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि लोकहिताचे स्पष्ट भान पाहता, या निवडणुकीत मतदार नवीन इतिहास रचतील, अशी चर्चेची जोरदार वारे वाहू लागली आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!