प्रभाग 9 मध्ये विकासाच्या नव्या अपेक्षांचा चेहरा चेतन राजपूत
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ (जनरल पुरुष) मतदारसंघातून चेतन देवसिंग राजपूत यांच्या उमेदवारीने परिसरात नवी आशा जागवल्याचे चित्र दिसत आहे. पद नसतानाही नागरिकांशी सातत्याने संवाद साधत प्रभागातील मूलभूत अडचणी, वाहतूक समस्या, तसेच उद्यानांची कमतरता यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी आतापासूनच कामाची रूपरेषा मांडल्याने मतदारांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. युवक नेतृत्वाचा नवा उमेदीचा चेहरा म्हणून चेतन राजपूत यांच्याकडे मतदारांची अपेक्षां आहे.
शहरातील प्रमुख रस्ते नियोजनबद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार करणे, रहदारीची कोंडी दूर करण्यासाठी मार्गांचे सुशोभीकरण करणे, बालकांसाठी उद्याने व ओपन जिमच्या सुविधा वाढवणे, धार्मिक स्थळांचा विकास व सुशोभीकरण करणे या सर्व बाबींवर चेतन राजपूत यांनी प्रभागासाठी भविष्यकालीन विकास आराखडा समोर ठेवला आहे. नागरिकांनी वारंवार मांडलेल्या पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, रस्त्यांच्या मजबुतीकरणासारख्या मागण्यांना प्राधान्यक्रमावर सोडवण्याचा त्यांचा निर्धार मतदारांना भावतो आहे. प्रभागातील नागरिकांमध्ये चेतन राजपूत यांच्याबद्दल वाढता विश्वास आणि त्यांच्यातील काम करण्याची ऊर्मी पाहता, प्रभाग 9 ‘ब’ मध्ये विकासाचा वेग वाढवण्यासाठी हे योग्य नेतृत्व असल्याची भावना बळावू लागली आहे. अपेक्षित कामांना नव्या गतीने दिशा देत सर्वसमावेशक विकासाचा संकल्प करणारे चेतन राजपूत हे उमेदवार म्हणून मतदारांच्या विश्वासाचे प्रतीक बनत आहेत.