प्रभाग क्रमांक 17 भावनाताई साठी धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा होतोय येलगार!
प्रभाग क्रमांक 17 मध्ये यंदाची निवडणूक वेगळ्या लढाईचं प्रतीक ठरत आहे. वर्षानुवर्षे दारूच्या बाटल्या, पैसाअडका आणि प्रलोभनांचा खेळ करून मतदारांना फसवण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांना यावेळी जनता थेट हद्दपार करणार अशी जोरदार चर्चा रंगल्याचे दिसत आहे. प्रभागातील नागरिक आता स्पष्टपणे सांगू लागले आहेत “धनशक्ती नाही, जनशक्ती जिंकणार!” जनतेला सन्मान आणि विकास हवा आहे, आणि यासाठी या वेळी प्रभाग एकवटला आहे.या बदलाच्या लाटेच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेना शिंदे गटाच्या पुरस्कृत उमेदवार भावना कैलास विसपुते (सोनार). प्रभागातील महिलांचा भावनाताईंना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा निवडणुकीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरतो आहे. घराघरांतून महिला बाहेर पडून भावनाताईंच्या समर्थनार्थ एल्गार करत आहेत.
“पैसा असून कपटी नव्हे, तर जनतेत राहून काम करणारे नेतृत्व हवे!”
या घोषणेने प्रभागात नवा उत्साह निर्माण झाला असून भावनाताई या बदलाच्या आशेचा केंद्रबिंदू बनल्या आहेत. प्रभागातील तरुण देखील भावनाताईंच्या मागे ठामपणे उभे राहत, त्यांना नगरसेवक पदावर निवडून आणण्यासाठी दमदार जनसंपर्क मोहीम राबवत आहेत. कैलास भाऊ त्यांच्या सोबत घराघरात पोहोचत असून प्रभागातील प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडचण समजावून सांगत आहेत. सामान्य कुटुंबातील असल्यामुळे भावनाताईंच्या मनात सर्वसामान्यांच्या अडचणींची जाणीव आहे, आणि प्रभागाच्या विकासासाठी त्यांची झटण्याची तयारी मतदारांना स्पष्ट दिसतेय. प्रभाग क्रमांक 17 मध्ये धनशक्तीला बाजूला सारून जनतेनेच पुढाकार घेतला आहे
या वेळी सत्ता नाही, तर प्रामाणिकपणाचं आणि जनतेच्या शक्तीचं यश ठरणार आहे!