प्रभाग क्रमांक 13 प्रवीण महाजन यांच्या उमेदवारीचींच चर्चा विरोधकामध्ये धास्ती चे वातावरण !
प्रभाग क्रमांक 13 मध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण रंगतदार बनले आहे. कारण जनतेच्या मनात घर करून बसलेलं नाव प्रवीण भाऊ महाजन यंदा मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद प्रचंड असून गल्लीपासून मुख्य रस्त्यापर्यंत एकच चर्चा जोर पकडते आहे: “प्रवीण भाऊ आले म्हणजे कामं होतील!” लोकांशी संवाद, नम्र स्वभाव आणि नेहमी उपलब्ध राहण्याची त्यांची वृत्ती प्रभागात त्यांना वेगळ्या उंचीवर पोहोचवत आहे.
प्रवीण महाजन यांची खास ओळख म्हणजे दिवस असो वा रात्र, ते प्रभागासाठी नेहमी उपलब्ध असतात. एखाद्याचं बिल अडकलं असो, पाण्याची समस्या असो, रस्त्याची अडचण असो किंवा कोणाला तातडीची मदत हवी असो प्रवीण भाऊ हा पहिला फोन करणारा आणि पहिलाच धावून येणारा चेहरा ठरला आहे. प्रभागातील प्राथमिक समस्या, नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी आणि सामाजिक कामांमध्ये ते दाखवत असलेल्या सहभागामुळे त्यांच्याकडे लोक एक विश्वासू नगरसेवक म्हणून बघत आहेत. उमेदवारी जाहीर होताच प्रभागात उत्सुकतेची नवी लाट उसळली आहे. “काम करणारा नेता हवा” या जनतेच्या अपेक्षेला सर्वाधिक जुळणारं नाव म्हणजे प्रवीण महाजन, असा ठाम विश्वास मतदारांमध्ये दिसतो आहे. सतत जनतेत राहणारा, समस्या नोंदवून त्या सोडवण्यासाठी धडपडणारा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारा हा नेता आता निवडणुकीत कोणतं समीकरण बदलतो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.