प्रभाग क्र.१६ (अ) बदलाच्या हाकेला मिळतेय जनतेचा मजबूत प्रतिसाद म्हणजे राजेश शिवाजीराव पाटील
प्रभाग १६ (अ) मधील राजकारणाला सध्या एक नवं वळण मिळालं आहे, कारण या निवडणुकीत “जनतेचा हक्का चा माणूस” म्हणून ओळखले जाणारे राजेश शिवाजीराव (बापू) पाटील मैदानात उतरले आहेत. ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी जाहीर होताच परिसरात एकच चर्चा
“लोकांसाठी, लोकांमधून उभा राहणारा असा नेता बर्याच वर्षांनी दिसतोय!”
साधेपणाचा, जमिनीशी जोडलेपणाचा आणि सर्वांना आपलेसे करून घेण्याचा स्वभाव असलेल्या राजेश बापूंच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. राजेश बापूंची खासियत म्हणजे त्यांचा जमिनीवरचा टिकाऊपाणा. कुणी रस्त्यात थांबवलं, हात दिला की ते थेट लोकांसोबत उभे राहून संवाद साधतात. त्यांच्या चेहऱ्यावर ना राजकारणाचा गर्व, ना पदाचा अहंकार फक्त एक साधा, प्रामाणिक, सर्वसामान्य नागरिक. गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा, एखादी समस्या समजली की लगेच मागे न फिरता तोडगा काढणारा असा नेता प्रभागाला मिळतो कुठं म्हणूनच त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेला जनतेचा विश्वास आज वातावरण तापवत आहे. प्रभागात दिवसरात्र सुरू असलेल्या चर्चांमध्ये एकच सूर ऐकायला येतो.
“या वेळी हवा आहे काम करणारा नेता… आणि त्यासाठी एकच नाव पुरेसं: राजेश बापू पाटील!”
घोषणांचं आडंबर नाही, तर विकासाचा स्पष्ट आराखडा घेऊन ते जनतेसमोर येत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती यांसारख्या प्रश्नांना तातडीने हाताळण्याचे आणि प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध राहण्याचे त्यांनी वचन दिले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १६ (अ) मध्ये घुमणारा नारा आता अधिक ताकदीने ऐकू येतोय
“लोकांसाठी, लोकांमधून, लोकांचाच नगरसेवक राजेश बापू पाटील!”