प्रभाग क्रमांक 15अ मध्ये प्रशांत निकम यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा! तर संजू ठेकेदार यांच्यावर नाराजी.
अमळनेर शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 15अ. येथे निवडणुकीची लढत म्हणजे एखाद्या रणांगणासारखी “छातीला माती लावून मैदानात उतरणे” असा जिगरबाजपणा ज्याच्यात, तोच उभा राहू शकतो. अनेकांनी दडपणाखाली माघार घेतली, काहींनी हातमिळवणी केली, तर काहींचे राजकीय समीकरणे बदलले; पण या सगळ्या गोंधळात एकच नाव ठामपणे उभं राहतं प्रशांत मनोहर निकम. “पठ्याने पट ठोकून दोन्ही प्रवर्गातून ( महिलां/ पुरुष ) उमेदवारी करणं म्हणजे काय” याचा खरा अर्थ प्रशांत निकम यांनी दाखवून दिला आहे. लोकशाही अजून जिवंत आहे.
अर्ध्या रात्रीची गोष्ट संपूर्ण प्रभागात टपरीवरून चौकात पोहोचली धनशक्तीच्या दबावाला न जुमानता लढा देण्याऐवजी संजू ठेकेदार यांनी उमेश वाल्हेच्या माध्यमातून कोपऱ्यात बैठक करून घेतलेली अचानक माघार. हा लोकशाही वर केलेला घातच होता. या निर्णयामुळे त्यांची प्रतिष्ठा अक्षरशः इज्जतका फालुदा झाली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्यावर प्रभागात अविश्वास निर्माण झाला असून अनेक हितचिंतक आणि मतदार स्वतःला फसवलेले समजत आहेत.
“ज्यानी तुम्हाला साथ दिली ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही सांगत होतात संजू भाऊ त्या मतदारांचा एकदाही विचार केला नाही.?? असे कोणते संकट होते? की काही दलाली?? किती मोजून घेतले प्रभागात हीच तर चर्चा चालू आहे. ती नोकरीं नक्कीच मिळणार कां?? त्या त्या शिवशंकर महादेवाचा ही केला तुम्ही घात का त्याच्यावर हात ठेवून घेतली होती शप्पथ? मी फॉर्म माघे घेणार नाही असे लोक सांगत होते. खरंय?
मग तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील लोकांनी राजकारणात येऊच नये का? उचला सतरंज्या. विश्वासघाताने तुमच्यावर प्रचंड नाराजी आहेच म्हणा..
ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचे तिकीट कापले गेलेचं.
मागील काही दिवसात संजू ठेकेदार यांच्या विनंतीवरून प्रशांत निकम यांनी स्वतःच्या पत्नीचा महिलां प्रवर्गातील फॉर्म माघारी घेतला… आणि इथूनच प्रभागात असंतोषाची ठिणगी पडली. दिलेल्या संधीचे सोने करता आले नाही.
पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. प्रशांत निकम यांनी स्वतः पुरुष प्रवर्गातून नामांकन दाखल करताच चित्र पालटले. प्रचारा दरम्यान दिसणारी गर्दी, तरुणांचा दमदार प्रतिसाद आणि महिलांचा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग 15अ मध्ये उमेदवारीचा सूर स्पष्टपणे उमटत आहे. मतदार आता अधिक जागरूक, अधिक सजग असून “आम्हाला दबाव नव्हे, नेतृत्व पाहिजे” अशी भूमिका घेत आहेत. येत्या निवडणुकीत लोक स्वतःच्या विवेकबुद्धीने योग्य उमेदवार निवडतील, यात तिळमात्र शंका नाही. “प्रशांत निकम पुरुष प्रवर्गातून मैदानात आहेतच … आता बघू पुढे काय होतं!”
सविस्तर पुढे
विक्की जाधव. 91750 50300