प्रभाग 6अ आणि 6ब मध्ये सविता योगराज संदानशिव व दीपक हरी चौगुले यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 6अ आणि 6ब मध्ये सविता योगराज संदानशिव व दीपक हरी चौगुले यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा!

 

प्रभाग क्रमांक 6अ मध्ये सविता योगराज संधानशिव आणि प्रभाग 6ब मध्ये दीपक हरी चौगुले या दोन्ही उमेदवारांना मिळणारा वाढता जनसमर्थन पाहता नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक वर्षे प्रलंबित समस्या, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव या सगळ्यांमुळे प्रभागातील लोक त्रस्त झाले होते. पण सविताताई आणि दीपक भाऊ यांच्या उमेदवारीनंतर नागरिकांमध्ये “आता खरा बदल आपल्या प्रभागात दिसणार” असा विश्वास निर्माण झाला आहे. दोघांचेही जमिनीशी जोडलेले नेतृत्व आणि लोकांसाठी सदैव उपलब्ध राहण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या सभांमध्ये आणि भेटींमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते.

सविता योगराज संदानशिव या प्रभाग 6अ मधील महिला वर्गासाठी आधारवड ठरल्या आहेत. महिलांच्या विकास, सुरक्षितता, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि “प्रथम महिला  प्रथम विकास” ही त्यांची भूमिका आज भगिनीवर्गाच्या हृदयात विश्वास निर्माण करते. तर प्रभाग 6ब मध्ये दीपक हरी चौगुले हे सामान्य नागरिकांचे खरे सेवक म्हणून उदयास आले आहेत. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सार्वजनिक सोयी-सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या दौऱ्यांना आज मोठा जनसमर्थन मिळत आहे. “सामान्यांसाठी दीपक भाऊ… आणि महिलांसाठी सविताताई!” अशीच चर्चा प्रभागभर रंगतेय.दोघांच्या नेतृत्वाचा प्रभाव असा की प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे. 6अ आणि 6ब मध्ये सविता संदानशिव व दीपक चौगुले यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सर्वसमावेशक विकास होणार हे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत. निवडणूक जवळ येत असताना प्रभागात एकच घोषणा अधिक बुलंद होत आहे. “सविताताई आणि दीपक भाऊ… प्रभाग 6 चा चौफेर विकास यांच्याच हातात!”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!