प्रभाग क्र. 1 ब मध्ये कैलास पाटील यांच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष. आता भाकरी कुठून फिरणार..
प्रभाग क्रमांक 1 मध्ये या निवडणुकीत बदलाची हवा जोरात वाहू लागली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेली कामे, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे झालेले दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याने सामान्य जनतेचा वाढता रोष या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभागात कैलास तात्या पाटील यांच्या उमेदवारीने नवीन आशेचा दिवा पेटवला आहे. जमिनीवरचे, स्पष्ट बोलणारे आणि कोणत्याही परिस्थितीत नागरिकांसाठी उभे राहणारे असे त्यांचे जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व प्रभागातील प्रत्येक घरदारापर्यंत पोहोचत आहे.
कैलास तात्या पाटील हे फक्त नाव नाही तर संघर्षातून उभा राहिलेला एक आवाज आहे.
प्रभागात रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज, शाळांची सुविधा अशा अनेक प्रश्नांनी लोक त्रस्त आहेतच; पण प्रचारा दरम्यान कैलास तात्यांनी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन त्या समस्या समजून घेतल्या, उपाय सुचवले आणि पर्याय सांगितलं की हीचं वेळी आहे. आता योग्य पर्याय निवडून आणा. त्यांच्या पारदर्शक कामकाजाची छाप आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेले समर्पण पाहून आज प्रभागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहत आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकच चर्चा रंगत आहे “बदल हवा असेल, तर कैलास तात्या हवेत!”
त्यांच्या सभ्य नेतृत्वाला मिळणारा प्रचंड जनसमर्थन बघता प्रभागात उत्साहाची लाट उसळली आहे. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा, सर्वांना समान वागणूक देणारा आणि विकासाच्या नवा अध्याय लिहिणारा नेता म्हणून कैलास तात्यांचा आवाज आता प्रखर होत आहे. प्रभागात सर्वांच्या तोंडी एकच घोषणा “कैलास तात्या पाटील… प्रभाग 1 चा खरा आधार!” आणि नेतृत्व..