प्रभाग क्रमांक 2अ मध्ये देवेंद्र भानुदास कांबळे ह्या सामान्य कुटुंबातील उमेदवारांची जोरदार चर्चा!
प्रभाग क्रमांक 2अ मध्ये या निवडणुकीत जनतेच्या अपेक्षा आणि बदलाचा सूर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. सामान्य कुटुंबातून आलेले, जमिनीवरचं नेतृत्व म्हणून ओळख मिळवलेले देवेंद्र भानुदास कांबळे यांच्या उमेदवारीने प्रभागात नवीन आशेचा किरण निर्माण केला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या समस्या, लोकांशी दुरावा वाढवणारे नेतृत्व आणि विकासाच्या नावाखाली झालेला फक्त दिखावा यांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र भाऊंची उमेदवारी म्हणजे जनतेला मिळणाऱ्या न्यायाची सुरुवात असे चित्र प्रभागात दिसतेय.
देवेंद्र कांबळे हे घराघरात जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे, त्यांच्या दुःख-सुखात धावून जाणारे, “लोकांचा माणूस” म्हणून ओळखले जातात. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे मागील प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सर्वसामान्यांत नाराजी होती. पण देवेंद्र भाऊंनी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन केलेल्या संवादामुळे आज नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की “आता आमच्या प्रभागातही खरा बदल होऊ शकतो.”आज प्रभागात एकच चर्चा ऐकू येते देवेंद्र भाऊंचे नेतृत्व प्रामाणिक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक आहे. गरीब, मध्यमवर्गीय, कामगार, महिला सर्व स्तरातून त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद प्रभाग 2अ मध्ये परिवर्तनाची नांदी ठरत आहे. निवडणूक जवळ येत असताना लोकांचा विश्वास अधिकच दृढ होत आहे.