प्रभाग क्र. 8ब – अपूर्वा जालंधर चौधरी यांच्या उमेदवारीला उसळलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अपूर्वा जालंधर चौधरी यांच्या उमेदवारीला उसळलेला जनतेचा प्रचंड प्रतिसादाने प्रभागात येणार नवचैतन्य !

 

प्रभाग क्रमांक 8 बमध्ये गेल्या सात वर्षांपासून विकासाचा दिवा विझल्यासारखी अवस्था झाली होती. मागील नगरसेविकांनी नागरिकांच्या समस्या ऐकण्याचं सोडाच… पण त्यांच्या गल्ली-बोळात पाय ठेवावा इतकीही उपस्थिती दाखवली नाही. सुख-दुःखात कधी न दिसलेल्या या नेतृत्वामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आल्हादनगरचा रस्ता असो, सुंदरनगरचा मार्ग असो की स्वतःच्या कॉलनीतील ओपन स्पेस सर्व कामे वर्षानुवर्षे रखडलेली! गेट खाऊन गेले, जागा भकास, भराव कोसळले… आणि तरीही पाच वर्षात कोट्यवधी रुपये कमावून आता काही लाखांचे वाटप करून परत निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशा नेत्यांना नागरिकांनी ठाम नकार दिला आहे.

पिंपळे रोडवरील फुटलेल्या नगरपालिका पाईपलाइनमुळे रस्त्यावर पसरलेले पाणी आणि त्यात झालेला अपघात हा प्रभागातील बेफिकीर कारभाराचा जिवंत पुरावा आहे. संपूर्ण वार्ड घाणीच्या साम्राज्यात अडकलेला, आणि जे काही झाले तेही कमिशनखोरीच्या निष्कृष्ट कामांमुळे. इतक्या गंभीर समस्यांमध्ये नागरिक त्रस्त, आणि निवडणूक आली की पुन्हा चेहरा दाखवणाऱ्या लोकांबद्दल मतदार वर्ग आज अधिक जागरूक झाला आहे.

“आमचा वार्ड पुन्हा अंधारात जाऊ देणार नाही” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

अशा परिस्थितीत अपूर्वा जालंधर चौधरी या नव्या उमेदवाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा बदलाच्या सुरुवातीचा संकेत मानला जात आहे. सभ्य, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची ओळख निर्माण केलेल्या अपूर्वाताईंच्या भेटीसाठी नागरिकांनी घेतलेली गर्दी, महिलांचा वाढता पाठिंबा आणि युवकांचे प्रचंड उत्साहामुळे प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये एकच आवाज घुमतोय..

“आता पर्याय नाही… अपूर्वा ताईच हव्यात!”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!