दोंडाईचा पोलिसांनी चोरी गेलेल्या सात मोटरसायकली मिळवल्या….
मालपूर येथील १९ वर्षीय राहूल काकडे आरोपी ताब्यात….
मुळ मालकांनी मोटरसायकल घेऊन जायचे-दोंडाईचा पोलीसांचे आवाहन…
दोंडाईचा- सध्या शहरात दिवसागणिक चोरीच्या घटना घडत असल्याने,त्यात खासकरून मोटरसायकल चोरीच्या घटनेला चोरांकडूंन लक्ष केले जात होते.त्या पाश्वभुमीवर दोंडाईचा पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत मालपूर येथील १९ वर्षीय तरूण राहूल धनराज काकडे याला ताब्यात घेत.चोरी केलेल्या सात मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. म्हणून ह्या मोटरसायकली ज्या मुळ मालकांच्या असतील त्यांनी कागदपत्रांची ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्या कडून करण्यात आले आहे.