ग्रामविकासाचे आदर्श पाऊल : बोराडी ग्रामपंचायतीत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन …
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, कर भरणाऱ्यांचा व प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न…

बोराडी – शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत बोराडी येथे दिनांक ६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भव्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र ग्रामस्थांना आरोग्य संरक्षणासाठी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीचे कर घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण भरलेले नागरिक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामविकासासाठी आर्थिक शिस्त आवश्यक असल्याचे सांगत सरपंचांनी कर थकबाकीदार नागरिकांना तात्काळ कर भरण्याचे आवाहन केले.
या उत्साहाया उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
या कार्यक्रमास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे, मा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तसेच गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामविकासाच्या कार्यात प्रशासनाची सकारात्मक आणि लोकसहभागी भूमिका अधोरेखित झाली.
ग्रामसभेचे आयोजन सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्या रंधे, उर्मिला पावरा, नीता पवारा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंग पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंग कुवर, निलेश महाजन आणि सतीश पवार यांच्या सक्रीय सहकार्याने पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत राजपूत, आंबादास सगरे, गणेश भामरे, गजू पाटील, चंद्रकांत बडगुजर, भूषण कुलकर्णी, मुकेश जाधव, उमेश पावरा, बादल पावरा, विजय पावरा, शरद पवार तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम ग्रामपंचायत बोराडीच्या टीमवर्क, लोकसहभाग आणि प्रशासनाशी सुसंवादाचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे. समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा उपक्रम ग्रामविकासासाठीचे एक आदर्श आणि अनुकरणीय पाऊल ठरले आहे.