न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

प्रभाग क्र. १५ मध्ये सौ. भाग्यश्री भावेश जैन (पाटील) यांचा उपक्रम शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा सुंदर संगम.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्र. १५ मध्ये सौ. भाग्यश्री भावेश जैन (पाटील) यांचा उपक्रम शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा सुंदर संगम.

 

अमळनेर : विक्की जाधव 

प्रभाग क्रमांक १५ मध्ये सौ. भाग्यश्री भावेश जैन (पाटील) यांच्या पुढाकाराने आयोजित तुळशी विवाह व हळदी-कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात आणि अनुशासित वातावरणात पार पडला. प्रभागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतें. या कार्यक्रमात महिलांसाठी भेटवस्तूंचे वाटप करून सौ. भाग्यश्री जैन यांनी “आदर आणि आपुलकी” निर्माण केली.

मा. नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्या म्हणाल्या, “शिक्षित आणि संवेदनशील नेतृत्व समाजात नवा परिवर्तन घडवते.” सौ. भाग्यश्री जैन या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंता (E&TC BE) असून, त्या आधुनिक विचारसरणी आणि पारंपरिक संस्कार यांचीं जोड साधत आहेत. त्या प्रभागातील महिलांसाठी बचत गट उभारणी, लघुउद्योग विकास आणि युवकांसाठी रोजगार मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सौ. भाग्यश्री जैन यांच्या कार्यामागे त्यांचे पती भाऊसो. भावेश गुलाबचंद जैन (व्यापारी) यांची माणुसकीची प्रेरणा आहे. अन्नदान, कोविड काळातील मदतकार्य, धार्मिक व सामाजिक उपक्रम अशा कार्यातून त्यांनी समाजात सेवेचा दीप प्रज्वलित ठेवला आहे. “श्रेय नव्हे, कार्य महत्वाचं” हा त्यांचा दृष्टिकोन आजही अनेकांना प्रेरणा देतो.या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ताईसो. जयश्री पाटील, साई गजानन मंडळ अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, तसेच वसुंधरा लांडगे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार, गजसुदर्शन मंडळ आणि प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. सौ. भाग्यश्री जैन (पाटील) या उमेदवारीपेक्षा समाजसेवेच्या भावनेने कार्यरत असून, त्यांचा उद्देश स्पष्ट आहे  “राजकारण नाही, समाजकारणासाठी” आम्ही आहोत तयार प्रभाग क्रमांक १५ मधून लवकरच आपला आशीर्वाद घेण्यास येत आहोत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!